महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२० मे २५ मंगळवार
येथे आज दि.२० मे मंगळवार रोजी आपण भारताचे नागरिक म्हणून आपले आपल्या देशाकरिता काहीतरी देणे लागते या देश भावनेतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.सदरील तिरंगा रॅली शासकीय विश्रामगृह ते महात्मा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली तसेच भारत माता की जय आदी घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान भारतीय सैन्याच्या तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आम्ही प्रत्येक भारतीय असून भारतीय नागरिक म्हणून आपले आपल्या देशाकरिता काहीतरी देणे लागते या देश भावनेतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.या भव्य तिरंगा रॅलीत आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे,अरुणभाई गुजराती,विधान परिषद सदस्य,राजकीय नेते आदी मान्यवर तसेच माता भगिनी यांनी प्रतिसाद देत या भव्य तिरंगा यात्रेत आपला सहभाग नोंदविला.