Just another WordPress site

आडगाव-चिंचोली रस्त्यावरील कार व मोटारसायकल अपघातात वृद्ध ठार तर १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ मे २५ बुधवार

तालुक्यातील आडगाव येथून आपल्या १६ वर्षीय नातवाला घेवुन वृद्ध आजोबा चिंचोली येथे इयत्ता दहावीच्या निकालाची मार्कशीट घेण्यासाठी दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर त्यांच्या दुचाकीला पिकअप वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातामध्ये आजोबा जागीच ठार झाले तर नातू हा गंभीर जखमी झाला आहे.सदरहू गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.सदर हा अपघात मंगळवारी दुपारी घडला तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आडगाव ता.यावल येथील रहिवाशी सुभाष बाबुराव पाटील वय ७० हे दुचाकी क्रमांक एम.एच.०४ बी.एक्स.४५६८ द्वारे आपल्यासोबत नातू कल्पेश उत्तम पाटील वय १६ याला घेऊन चिंचोली येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आणि मार्कशीट घेण्यासाठी जात होते.दरम्यान चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांच्या दुजाकीला पीकअप वाहन क्रमांक एम.एच.०४ के.एफ.८४४० वरील अज्ञात चालकाने धडक दिली या अपघातामध्ये सुभाष पाटील हे जागीच मरण पावले तर कल्पेश पाटील याला गंभीर दुखापत झाली आहे.अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाता संदर्मातील यावल पोलिसांना कळविण्यात आली.घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक मक्सुद शेख हवालदार व संदिप सुर्यवंशी यांनी अपघातस्थळी जावुन अपघाताचा पंचनामा केला.तत्पुर्वी अपघातात गंभीर दुखापत अवस्थेतील कल्पेश पाटील यास पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर मयत सुभाष पाटील यांचा मृत अवस्थेतील देह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.या अपघाता संदर्भात यावल पोलीस ठाण्यात वासुदेव बाबुराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पीकअप वाहनवरील अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरच्या या अपघाताचा तपास यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख व पोलिस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.