Just another WordPress site

पाडळसे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.२५ मे २५ रविवार

ग्रामीण शिक्षण संस्था पाडळसे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची सन २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधी साठीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकारी मंडळ आणि नियामक मंडळाचे सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत हे विशेष !.सदर निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.उदय मधुकर चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी रामराव विठ्ठल पाटील आणि चिटणीसपदी प्रवीण प्रभाकर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दरम्यान आश्रयदाते व उपकारकर्ते या श्रेणीतून अरुण नेमचंद चौधरी यांची निवड झाली.तर कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निवड झालेल्या सदस्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत.१) श्री.अनिल लिलाधर चौधरी,२) श्री.जयंत मुरलीधर पाटील,३) श्री.ललितकुमार रमेश पाटील,४) श्री.प्रमोद रामकृष्ण बऱ्हाटे,५) श्री.शरद तुकाराम बऱ्हाटे,६) श्री.विनायक मधुकर पाटील,७) श्री.योगराज डिगंबर बऱ्हाटे,८) श्री.युवराज मधुकर पाटील तसेच नियामक मंडळ सदस्य म्हणून १) श्री.गोपाळ पिला पाटील २) श्री.रघुनाथ नारायण बऱ्हाटे आणि ३) श्री.सोपान खेमा पाटील यांची निवड करण्यात आली असून एकूण १५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सदर निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.एस.एल.पाटील,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.मयुर भगवान पाटील आणि मदतनीस म्हणून श्री.किशोर अरुण नेहेते व श्री.योगेश बळिराम नेहेते यांनी काम पाहिले.ग्रामीण शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय मधुकर चौधरी यांनी मतदार आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.