Just another WordPress site

यावलसह परिसरात शिवसेना सदस्य नोंदणीस सर्व जाती धर्मातील नागरिक व तरूणांचा मोठा प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ मे २५ रविवार

आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपआपली कंबर कसली असुन शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातुन सदस्य नोंदणी शिबीर अभियान राबविले जात असुन या आभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन त्यांच्या आदेशाने व शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या अथक प्रयत्नातुन जिल्ह्यात शहरी व ग्रामीण क्षेत्रात विविध ठीकाणी सदस्य नोंदणी शिबीराव्दारे सर्वसामान्य नागरीकांना शिवसेना पक्षाशी व त्यांच्या विचारांशी जोडले जात असुन या सदस्य नोंदणी शिबीरांना महिला,तरूण वर्ग व सर्वसामान्य नागरीक जोडला जात आहे.यावल येथे शिवसेना पक्षाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,यावल तालुका प्रमुख राजु काठोके,युवा सेना यावल तालुका प्रमुख अजय तायडे,सेनेचे तालुका संघटक भुषण उर्फ गोलु पाटील,यावल शहर महिला प्रमुख स्वाती पाटील,यावल शहर उपप्रमूख राजु सपकाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित शहरातील यावल ग्रामीण रूग्णालयाच्या शेजारी शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणी शिबीर घेण्यात आले व या सदस्य नोंदणी अभियानास सर्व पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.