Just another WordPress site

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ मे २५ सोमवार

येथील सुदर्शन सिनेमा चौकात प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि मुफ्ती हारुन नदवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही तर ही एक ऐतिहासिक चळवळ आहे व ही चळवळ प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि देशातील सामान्य माणसाच्या हक्कांचे संरक्षण करते.या मूल्यांवर विश्वास ठेवूनच या समाजहितैषी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी जनतेने दाखवलेल्या बंधुत्वाचे उदाहरण देत सांगितले की,काँग्रेस पक्ष देखील हाच बंधुभाव आणि सहिष्णुतेचे तत्त्व अंगीकारून समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणणारा पक्ष आहे.आज या मूल्यांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत हे निश्चितच पक्षासाठी ऊर्जा देणारे आहे.मुफ्ती हारुन नदवी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आज जेव्हा अनेकजण सत्तेच्या आकर्षणाने पक्ष बदलत आहेत त्याच काळात लोक समतेचा विचार,लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे व हे कार्यकर्ते पक्षाचे निष्ठावान सैनिक ठरतील असा विश्वास वाटतो.या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,माजी पं.स.गटनेते शेखर पाटील,हाजी शब्बीर खान,काँग्रेम कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे आणि यावल शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सदरील पक्षप्रवेश सोहळ्यात हकीम मो.याकूब शेख,अताउल्ला खां सैफुल्ला खां,उमर अली मोहम्मद कच्छी,शमसुद्दीन सुलतान खान,शेख निसार मोमिन,रफिक मो.हनीफ टेलर,शरीफउद्दीन सिराजुद्दीन,शेख फारुक शेख युसुफ मामून,रियाज देशमुख,शेख अरशद अ.रऊफ मनियार,अल्ताफ शेख,आसिफ शेख युसुफ,हाफिज कच्छी,एजाजुद्दीन मो.हनीफ यांच्यासह असंख्य अल्पसंख्यांक समाजाच्या शेकडो कार्यक्रर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.