Just another WordPress site

अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजपातर्फे विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ मे २५ मंगळवार

थोर समाज सुधारक राणी आहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी यावल मंडळच्या वतीने पाडळसा येथील भिल्लट बाबा देवस्थान येथे मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवुन साफसफाई व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या १७२५ ते १७७५ या काळातील एक महान मराठा राज्यकर्ती व समाज सुधाकर होत्या तसेच त्या आपल्या प्रशासकीय कार्यकुशलतेसाठी व सामाजीक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या.त्यांनी आपल्या शासन काळात संपूर्ण देशात विविध ठीकाणी हिंदु मंदिरे व नदीघाट बांधलीत तर लोकांना रोजगार उपल्बध व्हावा यासाठी औद्योगीक धोरण आखत प्रसिद्ध हिन्दू मंदीरांचा त्यांनी र्जिणोद्धार केले अशा या थोर समाज सुधारक राणी आहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी यावल मंडळच्या वतीने पाडळसा येथील भिल्लट बाबा देवस्थान येथे मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवुन साफसफाई व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका सरचिटणीस विलास चौधरी,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह भरत पाटील,पूनम पाटील,गोलू पाटील,कैलास सपकाळे,नितीन सपकाळे,नितीन तायडे,बापू कोळी यांच्यासह महिला व ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात आपला सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.