Just another WordPress site

डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे हे तायडे दाम्पत्य “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ मे २५ गुरुवार

आपल्या दैदिप्यमान कामगिरीत नेहमी सातत्य ठेऊन आपल्या शिरपेचात आणखीन एका पुरस्काराची संख्या वाढवत नुकत्याच दुबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा (ता यावल जि जळगाव) येथील मूळ रहिवाशी व डोंबिवली (मुंबई) येथे सध्या वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त इंजिनिअर व समाजसेवक तसेच आपल्या गायनातून अख्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे गायक डॉ.डिगंबर सिताराम तायडे तसेच डॉ.डिगंबर तायडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहून खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका व गायिका शकुंतला डिगंबर तायडे या तायडे दाम्पत्यांना “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५ (इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर लीडर्स अवार्ड-२०२५) ने सन्मानित करण्यात आले आहे.परिणामी डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे या जोडगोळीने आपल्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.यात डॉ.डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांनी आजपावेतो आपल्या गायन,समाजसेवा व सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून पन्नासच्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळविली असून पन्नासच्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळविणारी भारतातील एक नंबर जोडी ठरली असल्याची भावना जनसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहे.इंडो-युएई ॲवार्ड समीतीतर्फे वाधवन ॲवार्ड कौन्सिल व स्टेक ख्रीस्ट एलीयॅट ग्रुप यांनी आयोजीत केलेला “ईन्टरनॅशनल इन्फ्लुयंसर लिडर्स ॲवार्ड दुबई २०२५” हा पुरस्कार प्रमुख अतीथी व दुबईचे महामहीम डॅा.बाउ अब्दुल्ला,डॅा.अनवर हमीम, बीझीनेस वुमन साल्वीसा बोतीनीम,भारतीय नटी राखी सावंत,भारतीय नटी व धुन सिनेमाची अभिनेत्री रेमी सेन यांचे हस्ते डॅा.डिगंबर सिताराम तायडे व त्याची धर्म पत्नी सौ.शकुंतला डिगंबर तायडे यांचा ईन्टरनॅशनल इंन्फ्लुयंसर लिडर्स ॲवार्ड देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.

दरम्यान ओस्टाके संचालित ख्रिस इलियट ग्रुपच्या वतीने तसेच वावधन इंडिया अवॉर्ड कौन्सलिंगच्या माध्यमातून “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५ (इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर लीडर्स अवार्ड-२०२५) ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.यात दुबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे या दाम्पत्याला “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.दुबई येथे ओस्टाके संचालित ख्रिस इलियट ग्रुपच्या २६ व्या आवृत्ती समारोह कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमास क्रिशतोफर इलियट म्यानेजींग डायरेक्टर,सीईजी स्ट्याक,जैन मुनी डॉ.गनी राजेंद्र विजय,डॉ.अन्वर हमीम,सिल्विया बॉटीनी,लिव्हडमीला स्टीरटोव्हा,डॉ.बु अब्दुल्लाह,मिस पिगाह गोल,ऍड.इब्राहिम मोहम्मद अल हद्दाद,लिओनार्ड प्रिका,कय झमीर,केविन प्यारसि,मॅक्झिम स्टॊटस्काई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान-२०२५ अंतर्गत शकुंतला तायडे यांना “मल्टी ट्रेंड वुमन ऑचिव्हर ऑफ द इयर-२०२५” व डॉ.डिगंबर तायडे यांना “इन्फ्रास्ट्रक्चर एक्सलन्स अँड कल्चरल इम्पॅक्ट अवॉर्ड-२०२५” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यासोबतच डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे यांनी  इंटरनॅशनल सिल्व्हर स्क्रीन फिल्म अवॉर्ड-२०२४-२५,महाराष्ट्र अभियान पुरस्कार-२०२५,गायन स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार अशा प्रकारचे ५० च्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळविली आहेत हे विशेष !.दरम्यान डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे यांनी आपल्या दैदिप्यमान कामगिरी करीत असतांना अनाथ आश्रमांना दान,समाजसेवा,विविध सामाजिक उपक्रमात सहभाग,संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम अभियान, आरोग्यसेवा,शैक्षणिक उपक्रमात हिरीरीने सहभाग अशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवून यशस्वी मार्गक्रमण करीत आहे हि त्यांच्या जमेची बाजू आहे.  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.