यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २५ शनिवार
येथील निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ.शंतनु देशपांडे यांचे काका तसेच यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाकदादा प्रभाकर देशपांडे वय ६४ वर्ष यांचे आज दि.३१ मे २५ रोजी सकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले.दरम्यान शशांकदादा देशपांडे यांची अंत्ययात्रा आजच दुपारी ३ वाजता त्यांच्या नगर परिषद मार्ग,कोर्ट रोड वरील निवासस्थानाहुन निघणार आहे.
दरम्यान शशांकदादा देशपांडे हे २००१ या काळात यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन निवड्रन आले होते व त्यांच्या कार्यकाळात अत्यंत गंभीर बनलेला शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला होता तसेच यावल नगरीचे शिल्पकार म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.नगर परिषदची नवीन सुज्ज ईमारत ही त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आली होती हे विशेष !.शशांक दादा देशपांडे यांच्या पश्चात भाऊ,सुन,नांतवंडे असा परिवार असुन ते निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ.शंतनु देशपांडे यांचे काका होत.