यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २५ शनिवार
येथील नगर परिषदच्या माध्यमातुन होणारा पाणीपुरवठा हा शहरात गेल्या आठ दिवसांपासून झालेला नसत्याने नागरीकांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून पाणीपुरवठा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा व पाणी पुरवठा संदर्भात जे काही समस्या असेल त्या तात्काळ आपल्या स्तरावर मार्गी लावाव्या व पाणी पुरवठा करणारे कंत्राटदाराकडे लागलेले कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे त्यांनी संप पुकाराला आहे तरी त्यांचे जे काही महिन्यांचे पगार थकीत बाकी असतील ते तात्काळ देणी करावी व यावलकरांचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा तसेच यावल शहरांतील आठवडे बाजार हा अंकलेश्वर बऱ्हाणपुर महामार्गावर भरला जातो त्या ठिकाणी मोठे अवजड वाहन हे वेगाने ये-जा करत असतात या आठवडे बाजारात महिला मोठ्याप्रमाणात बाजार करण्यासाठी येत असतात या ठिकाणी भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आठवडे बाजार हा नेहमी प्रमाणे नगरपरिषदेच्या आतल्या जागेत भरत असे मात्र गेल्या अनेक वर्षा पासून आजु-बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण नगर परिषदने काढल्यास बाजार हा पुर्वीच्या ठीकाणी बसण्यास जागा मोकळी होऊ शकते व सदरील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने निकाल सुद्धा दिलेला आहे असे असतांना नगर परिषद प्रशासनाने आजपावेतो कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच यावल शहरात ठीकठिकाणी महिलांसाठी प्रसाधन गृह व शौचालय अस्तित्वात नसल्याने आठवडे बाजारात येणाऱ्या महिला भगिनीसाठी व नागरिकांसाठी ही सुविधा तात्काळ नगर परिषदे मार्फत उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना देण्यात आले.
सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असुन मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या वतीने मोठया संख्येत शहरातील नागरीक व महिलांना सोबत घेवून तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देतांना गौरव कोळी शहराध्यक्ष यावल,किशोर नन्नवरे तालुकाध्यक्ष शाम पवार,उप तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहीत विधी विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांची उपस्थिती होती.