यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ जून २५ सोमवार
तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर काल दि.०१ जून रविवार रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला व या अपघातात दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अपघातात अर्शद शेख सुपडू रा.मिल्लत नगर, फैजपूर हे एमएच १९ डीएल १३०८ या क्रमांकाच्या बजाज प्लेटिना मोटारसायकलने यावलकडून फैजपूरच्या दिशेने जात होते व त्याचवेळी शिरसाड साकळी तालुका यावल येथील पुरुषोत्तम रामभाऊ साळी हे एमएच १९ बीपी ८९४२ क्रमांकाच्या सीबीझेड एक्सटी मोटारसायकलने फैजपूरहून यावलच्या दिशेने येत होते.दरम्यान हिंगोणा गावाजवळ एका वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली व दोघेही वाहन चालक जखमी झाले आहेत.सदरील अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ ११२ या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.सदर घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देविदास सूरदास,विकास सोनवणे,योगेश दुसाने व अरुण नमाईते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.या अपघाताची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात मध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.