दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख
पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरातील कंवरनगर परिसरातील झोपडपट्टी परिसरात धाड टाकून एका तरुणाच्या घरातून तब्बल १० तलवार व ९ चाकू असे एकूण १९ शस्त्र जप्त केले आहेत.सदरील कारवाई गुरुवार दि.२० रोजी करण्यात आली.या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.या युवकाने हे शस्त्र कशासाठी गोळा केले?याबाबत पोलिस तपास करत आहेत.राजेश उर्फ सोनू सुभाष चावरे वय २५ वर्षे (रा.कंवरनगर झोपडपट्टी)असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीवरून राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील कंवरनगर झोपडपट्टीमधील रहिवाशी राजेश चावरे याच्या घराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा रचून झडती घेऊन शस्त्र जप्त केले.या प्रकरणी राजेशला शस्रांसह ताब्यात घेऊन त्याला राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.सदरील कारवाई पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील एपीआय योगेश इंगळे,रणजित गावंडे,रोशन वऱ्हाडे, सूरज चव्हाण,राजीक रायलीवाले,निखिल गेडाम यांनी केली.पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.