यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ जून २५ मंगळवार
येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांची जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांच्याकडे यावल पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस निरिक्षक प्रदिप पवार हे गेल्या दिड वर्षापासुन यावल पोलीस स्टेशनला कार्यरत होते व त्यांची जिल्हापेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने प्रशासकीय कारणावरून तसेच कायदा सुव्यवस्थाच्या अनुषंगाने जिल्ह्याअंतर्गत १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या रिक्त झालेल्या ठीकाणी शनीपेठ जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांची यावल पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थता अबाधित ठेवण्यास आपण कटिबद्ध असून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नूतन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी म्हटले आहे.