जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ जून २५ मंगळवार
सन २०१५ चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) चे पोटनियम (२) व त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकारानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या वतीने प्रशासकीय कारणावरून कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने,जनहितार्थनवीन नेमणूक,प्रशासकीय बदली अंतर्गत १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आलेले आहेत.
दरम्यान पोलीस अधिकारी यांचे नाव/पदनाम,सध्या कार्यरत असलेले ठिकाण तसेच नव्याने नेमणूक करण्यात आलेले ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.यात पोनि/बबन मारुती आव्हाड-स्थागुशा जळगाव-प्रभारी एमआयडीसी (प्रशासकीय),पोनि/संदीप भटू पाटील-एमआयडीसी-प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव (रिक्त पदात),पोनि/कावेरी महादेव कमलाकर-चोपडा ग्रामीण-प्रभारी शनिपेठ (प्रशासकीय),पोनि/दत्तात्रय युवराज निकम-अमळनेर-प्रभारी अमळनेर (रिक्त पदात), पोनि/रंगनाथ त्र्यंबक धारबडे-शनिपेठ-प्रभारी यावल (प्रशासकीय),पोनि/प्रदीप खंडू ठाकूर-यावल-प्रभारी जिल्हापेठ (प्रशासकीय),पोनि/सुनील हंसराज पवार-पारोळा-नियंत्रण कक्ष जळगाव (रिक्त पदात),पोनि/सचिन सिताराम सानप-पहूर-प्रभारी पारोळा (रिक्त पदात),सपोनि प्रमोद रामकृष्ण कठोरे-आगुशा-प्रभारी पहूर (रिक्त पदात),सपोनि जनार्दन एकनाथ खंडेराव-वरणगाव-यावल (प्रशासकीय),सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल-भुसावळ बाजारपेठ-प्रभारी वरणगाव (रिक्त पदात),सपोनि प्रकाश राधाकिसन काळे-पिंपळगाव हरेश्वर-जळगाव शहर (प्रशासकीय),सपोनि कल्याणी राजेश वर्मा-जळगाव शहर-प्रभारी पिंपळगाव हरेश्वर (रिक्त पदात),पोउनि सोपान रमेश गोरे-पाचोरा-स्थानिक गुन्हे शाखा (रिक्त पदात) अशा १४ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अधिकारी वर्गाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.सदरील बदल्यांच्या आदेशाचे पत्रक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या वतीने नुकतेच जारी करण्यात आलेले आहे.