Just another WordPress site

गावपातळीवर शासकिय योजनांचा लाभ योजनेअंतर्गत अंजाळे येथे शिबीर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जून २५ बुधवार

तालुक्यातील अंजाळे गावात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सुचनेवरून गेल्या आठवड्याभरापासुन त्यांच्या मतदारसंघात महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन गावपातळीवर सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात येत असुन १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभाग,वन विभाग,महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जगनाथ महाराज मंदिर,सभागृह अंजाळे येथे आज दि.०४ जून बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय विभागांच्या योजनांचा थेट लाभ मिळाला.अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून योजनांचा लाभ घेतला.रावेर-यावल विधान सभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.यावेळी फैजपुर विभाग प्रांत अधिकारी बबन काकडे,तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर,ह.भ.प.धनराज महाराज,हिरालाल चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा),सागर कोळी तालुकाध्यक्ष भाजपा यावल,विलास चौधरी सरचिटणीस भाजपा,दीपक चौधरी,यशवंत सपकाळे आणि भारतीय जनता पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.