यावल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न !! बैठकीत ईद शांततेत पार पाडण्याचे आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जून २५ शुक्रवार
उद्या दि.७ जुन शनिवार रोजी साजरी होणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी सायंकाळी पोलिस स्टेशन आवारात शांतता समिती सदस्यांची बैठक नुकतेच रूजु झालेले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या शांतता समितीच्या बैठक प्रसंगी समिती सदस्यांसह पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी बकरी ईद हा सण शांततेने पार पाडण्याचे सर्व समाज बांधवांना आवाहन केले.
या बैठकीत शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,भगतसिंग पाटील,पुंडलिक बारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अफवांवर विश्वास न ठेवता बकरी ईद शांततेत पार पाडावी असे आवाहन सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.प्रसंगी नूतन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी नागरीकांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास न ठेवता पारंपारिक पद्धतीने व शांततेत ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.यावेळी शेख अलीम,जेष्ठ सदस्य विजय सराफ, संतोष खर्चे,अशपाक शाह,चेतन आढळकर,भूषण फेगडे,मुकेश कोळी,पराग सराफ,करीम मणियार,नईम शेख,सय्यद युनूस,सय्यद युसुफ,समीर खान तसलीम खान,संतोष खर्चे,सलीम शेख फारुख,शेख मोहम्मद शफी,शेख हबीब मंजर यांचेसह शहरातील शांतता समिती सदस्य उपस्थित होते.