यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ जून २५ शनिवार
तालुक्यातील फैजपूर येथील विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच राबवण्यात आले.सदर शिबिरात नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हेमंत ठाकरे यांनी विजयस्तंभ अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व विविध परीक्षांचा अभ्यास कसा करावा ? कोणते संदर्भ पुस्तके वापरावीत ? व अभ्यासाचे नियोजन कसे करावे ? या संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजयस्तंभ अकॅडमीचे संचालक सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे यांच्या वतीने नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हेमंत ठाकरे तसेच विजयस्तंभ अकॅडमीचे कॉर्डिनेटर आकाश शिवाजी चौधरी यांनी समाजसेवक तसेच पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य मोहमांडली जुम्मा तडवी यांचा यांचा सत्कार करण्यात आला.विजयस्तंभ अकॅडमीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य ते मार्गदर्शन शिबिर तसेच सेमिनार तसेच विविध कार्यशाळा तसेच विविध उपक्रम नेहमी राबवले जातात अशी माहिती विजयस्तंभ अकॅडमीचे संचालक सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे यांनी दिली.सदर कार्यक्रम यशस्वितेकरिता विजयस्तंभ अकॅडमीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन नितेश भारंबे यांनी केले.तर अध्यक्षीय भाषणात सहाय्यक प्राध्यापक आकाश तायडे व संचालक विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य व आपण घ्यावयाची मेहनत सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या तीन गोष्टी आपल्याला सांगितल्या.त्यामध्ये त्यांनी अभ्यासासाठी बसायला योग्य ती जागा व अभ्यासासाठी योग्य ते मार्गदर्शन व योग्य ते संदर्भ पुस्तके असे त्रिसूत्री स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विविध मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान विजयस्तंभ अकॅडमीमध्ये व अभ्यासिकेमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते तसेच विजयस्तंभ अकॅडमीमध्ये आतापर्यंत शेकडो विद्यार्थी यशस्वी झालेल्या आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये दिसून येतात तसेच पत्रकार जुम्मा तडवी यांनी समाजाप्रती विद्यार्थ्यांनी कशी जाणीव ठेवावी याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.