Just another WordPress site

कोरपावली येथे शेळी वाचवितांना तरूणाचा सांडपाण्याच्या खड्डयातील चिखलात पडून दुदैवी मृत्यु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ जून २५ सोमवार

तालुक्यातील कोरपावली येथील एका १८ वर्षीय तरूणाचा सांडपाण्याच्या खुडुयात पडून चिखलात गुदमरून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना काल दि.०८ जून शुक्रवार रोजी घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,जयेश संतोष महाजन वय १८ वर्ष राहणार कोरपावली तालुका यावल हा गरीब कुटुंबातील शेळ्या मेंढ्या चालून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.दरम्यान काल दि.८ जुन शुक्रवार रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कोरपावली गावाबाहेरील जुने कोरपावलीकडून यावलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सांडपाणी असलेल्या खड्ड्यात शेळी गेल्याने त्या शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या जयेश संतोष महाजन याचा सांडपाण्याच्या खड्डयात पाय घसरून तोल गेल्याने सदर युवक खुड्डयात पडल्याने चिखलात अडकुन व गुदमरून त्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली.दरम्यान सदरील तरूण खड्डयात पडल्याचे वृत्त कळताच सर्व ग्रामस्थांनी त्याला वाचविण्यासाठी शर्यतीचे पर्यत करीत गळातून बाहेर काढले व बेशुद्ध अवस्थेत त्या तरुणाला कृउबाचे सभापती राकेश फेगडे,सरपंच विलास अडकमोल,सामाजिक कार्यकर्त उमेश जावळे व ग्रामस्थांनी त्यास तात्काळ मोटर सायकलवर बसवून यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले असता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी अंती सदरचा युवक हा मृत्यू झाल्याचे घोषित केले.सदरहू  मृताच्या नातेवाईकांनी यावल पोलीस स्टेशनला सदरच्या घटनेची माहीती दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.शेळया चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाच्या अशा मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.