Just another WordPress site

हडकाई नदीवर पुल बांधल्यास अनेक समस्या सुटतील-कृउबा सभापती राकेश फेगडे यांनी व्यक्त केला दूर दृष्टिकोन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ जून २५ बुधवार

येथील शहराला लागुन वाहणाऱ्या हडकाई-खडकाई नदीच्या पात्रातुन जाणारा जुने कोरपावली रस्ता हा शेतीसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग असून या मार्गाने फारच कमी वेळेत कोरपावली गाव ते यावल शहर गाठता येते.सदरहू अशा या मार्गावरील रस्त्यावर असलेल्या हडकाई नदी पात्रात पुल बांधून शेतकऱ्यांचा मार्ग सुकर करावा अशी मागणी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी केली आहे.

दरम्यान यावल हुन अगदी पाच ते सहा किलो मिटर लांबीच्या असलेल्या यावल ते कोरपावली जुने मार्गावरील रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी रस्ता डांबरीकरण मंज़ुर केले असुन कामास येत्या काही दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिली असून याच मार्गावर असलेल्या हडकाई नदीच्या पात्रात पुल बांधावे अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे.लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देवून पुल बांधल्यास हरिपुरा,मोहराळा, महेलखेडी व दहिगाव कोरपावली येथील ग्रामस्थांना अगदी कमी वेळेत यावल जाण्या येण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल शिवाय शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असा दूरदृष्टीकोन राकेश फेगडे यांनी व्यक्त केला असून याबाबतची मागणी करून आपण रावेर यावलचे आमदार अमोल जावळे आणी चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे या दोघाही आमदारांशी संपर्क साधुन या नदी पात्रात पुल बांधण्याबाबत आग्रही असल्याचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.