Just another WordPress site

मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला !! कूटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जून २५ शनिवार

तालुक्यातील मोहराळा गावातुन गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल शुक्रवारी विहिरीत आढळून आला असुन तरूणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण होत संतप्त जमावाने एकाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मोहराळे गावात दाखल झाले.एका कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.मोहराळा गावातील साहिल शब्बीर तडवी (वय १९) हा १६ जूनपासून बेपत्ता झाला होता त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान या तरुणाचा मृतदेह काल शुक्रवारी मोहराळा गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेत विहिरीत मिळून आला.तरुणाच्या मृतदेहाची माहिती गावात मिळताच जमावाने गावातील एका कुटुंबावर घातपाताचा संशय व्यक्त करीत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे,हवालदार वासुदेव मराठे, हवालदार सुनील पाटील,अमित तडवी हे दाखल झाले.

इन कॅमेरा शवविच्छेदनाची नातेवाईकांकडून मागणी

पोलिसांनी गावातील काही जणांना ताब्यात घेतले असून रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून कुटुंबियांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली आहे.त्यानुसार पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला होता तर गावात हवालदार नीलेश चौधरी,मोहन तायडे,अल्लाउद्दीन तडवी,भरत कोळी,सागर कोळी यांसह कर्मचारी तैनात केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.