Just another WordPress site

यावल आगारातून मेहकर बस सुरु करण्याची प्रवासी वर्गातून मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जून २५ शनिवार

येथील एस टी आगारातुन लांब पल्यांच्या जाणाऱ्या बस गाडयांमुळे आगाराच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असून यावल माहुरगडनंतर आता यावल मेहकर बस सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात आली आहे.

यावल एसटी बस आगार हे मागील काही वर्षांपासुन वाहनांची कमतरता तर कधी नादुरूस्त बसेस तर कधी चालक व वाहकांच्या पन्नासहुन अधिक रिक्त असलेल्या जागा अशा अनेक संकटांना व अडचणींना सामोरे जाणारे कदाचीत यावल आगार हे जिल्ह्यातील एकमेव एसटी आगार असावे असे प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे व असे असतांनाही लाडकी बहीण व ग्रामीण क्षेत्रातील प्रवासी बांधवांच्या लालपरीवर असलेल्या प्रेमामुळे आपली सर्वांची आवडती लालपरीने यावलच्या एस टी आगारास सावरले आहे.यात लांब पल्यांचे शेड्युलमध्ये यावल ते माहूरगढ जाणाऱ्या एस टी बसने एप्रील २०२४ ते मार्च २०२५ च्या जुनपर्यंत लक्ष वेधणारे व प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने सुमारे १ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे.तरी याच मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी यावल ते मेहकर दरम्यान एक बस सोडण्यात यावी व तिचा परतीचा वेळ रात्री उशीरा रेल्वेने प्रवास करून आपल्या गावाकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी भुसावळ बसस्थानकावरून रात्री ११ वाजेची असावी अशी मागणी असंख्य प्रवासी नागरीकांची आहे.तरी यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आगाराच्या उत्पन्नात वाढ व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन यावल ते मेहकर ही बस सुरू करावी अशी मागणी असंख्य प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.