यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २५ शनिवार
भारतीय जनता पक्ष साकळी-किनगाव मंडळ यावल-पश्चिमच्या वतीने जागतिक योग दिवस निमित्ताने भवानी माता मंगल कार्यालय साकळी येथे योग शिबीर आयोजित करण्यात आले.सुरुवातीला प्रस्तावना डॉ.सुनिल पाटील भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष व योगदिवस संयोजक यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आजचा दिवस योग दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना UNO मध्ये २७ सप्टेंबर २०१४ यादिवशी भाषणाद्वारे योगाचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले व त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा केला जातो असे नमूद केले.५ हजार वर्षांपासून भारतातील ऋषीं मुनी यांनी योग जगाला दिला व मानवी जीवनातील महत्व सांगितले.योगा हा मन,शरीर यांना जोडून ठेवण्याचे साधन आहे असे प्रतिपादन डॉ.सुनिल पाटील साकळीकर यांनी केले.
योगशिक्षक म्हणून रामकृष्ण खेवलकर साकळीकर यांनी वेगवेगळे योग आसन करून दाखविले व सर्वांकडून करून घेतले तसेच त्याचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून सांगितले.शिबिरास मंडळ अध्यक्ष अनिल पाटील किनगाव,जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील,सभापती प्रभाकर सोनवणे,उज्जैनसिंग राजपूत,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील,कृऊबास संचालक सुनिल नेवे,विकासो चेअरमन विलास काळे,तेजस पाटील,सूर्यभान बडगुजर,राजेंद्र नेवे,नितीन फन्नाटे,योगेश खेवलकर,मयूर पाटील दहिगाव,अजय पाटील पिळोदा, विशाल पाटील,विकी सोनवणे,ज्ञानेश्वर सोनार,विशाल वाघळे,नितीन महाजन,विनोद खेवलकर ग्रा प सदस्य,आकाश पाटील,गिरीष प्रजापती यांच्यासह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.