Just another WordPress site

यावल आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी ओटे बांधणार-आ.अमोल जावळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अभिवचन !!

शिवसेना जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांच्या प्रयत्नांना यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ जून २५ सोमवार

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना देण्यात आलेल्या निवेदनातील समस्या जाणुन घेत आपण बाजारात ओटे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असुन ईतर समस्यांचा देखील पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी शिवसेनेचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांच्याशी बोलतांना सांगीतले.यावेळी यावल शहरात शुक्रवारीच्या दिवशी भरणाऱ्या आठवडे बाजारातील विविध नागरी समस्या बाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत समस्या व अडचणींचा प्रश्न मांडले.

दरम्यान नागरीकांच्या समस्या मार्गी लागाव्या या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला समस्यांचा उपयोजना कराव्या आणि शेतकरी व व्यापारी वर्ग तसेच बाजार करणाऱ्या महिला व पुरुष यांच्या गंभीर समस्याबाबत आदीच शिवसेनेच्या वतीने यावल नगरपरिषद मुख्यधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.याच संदर्भात तात्काळ कायमस्वरूपी उपयोजना व्हावी अशी ठाम मागणी शिवसेनेने लावून धरली असून रावेर यावलचे आमदार अमोल जावळे यांना भेट घेवुन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावल शहरातील आठवडे बाजारातील अडचणी व समस्या लिखित निवेदनाव्दारे मांडल्यात यात शुकवारच्या दिवशी भरणाऱ्या आठवडे बाजारात अनेक सुविधांचा अभाव असुन विविध ठिकाणाहुन जिवनाश्यक वस्तु विक्रीला येणाऱ्या शेतकरी व व्यापारी बांधवांना बसण्यासाठी ओटे नसल्याचे या निवेदना नमुद करण्यात आले.दरम्यान यावल नगर पालिका प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कायम ही स्वच्छता मोहीम आठवडे बाजार परिसरात राबविण्यात यावी यासाठी आपण नगरपालिका प्रशासनाला लिखित सुचना करणार असल्याचे रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी वेळी शिवसेनेच्या पदाधिकारी यांना सांगीतले व आठवडे बाजारात शेतकरी व व्यापारी बांधवांना आपल्या जिवनाश्यक वस्तु विक्रीसाठी बसण्याची सोय व्हावी यासाठी ओटे बांधण्यासाठी निधी उपल्बध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी शिवसेनीकांशी संवाद साधतांना सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.