Just another WordPress site

दिव्यांग बाधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार-सीईओ मिनल करनवाल यांचे दिव्यांग बांधवांना आश्वासन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ जून २५ मंगळवार

प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुक्याच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या ग्रामीण पातळीवर भेडसावणाऱ्या अडचणी व समस्याबाबत जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

यावल पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी या कार्यक्रमा प्रसंगी रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहिली.यावेळी दिव्यांग बांधवांसाठी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ मंजुश्री गायकवाड (बोरसे) तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना दिव्यांग बाधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सीईओ मिनल करनवाल यांनी आमदार अमोल जावळे व आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे उपस्थितित प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील व त्यांच्या सहकार्याना दिले.यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचे पदाधिकारी यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.