यावल नगर परिषदने विस्तारीत भागात वाहणाऱ्या नाल्याची सफाई न केल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका !!
तात्काळ नाला सफाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजीतदादा गटाचे कदीर खान यांची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २५ शनिवार
येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फालक नगर व आयशा नगर या विस्तारीत वसाहतीला लागुन जाणाऱ्या नाल्याची नगर परिषद प्रशासनाकडून अद्यापपर्यंत सफाई करण्यात आलेली नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरीकांना पावसाळ्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागणार असुन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सदरहू प्रशासनाने तात्काळ नाला सफाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजीतदादा गटाचे कदीर खान यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आजित पवार गटाचे कदीर खान यांनी म्हटले आहे की,शहराला लागुन असलेल्या विस्तारीत वसाहतीला लागुन असलेल्या फालक नगर,पांडूरंग सराफ नगर,आयशा नगर आदी वस्तींना लागून जाणाऱ्या व सर्वाधिक वेगाने तुंबुन पाऊसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची यावल नगर परिषद प्रशासनाकडून जुन अखेर संपले तरी देखील या नाल्यातुन दुर्गंधीच्या कचऱ्यांमुळे या क्षेत्रात राहणाऱ्या अनेक समस्या व रोगराईला सामोरे जावे लागत आहे.तसेच या दुर्गंधीमुळे पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असुन नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातुन या नाल्याची साफसफाई करण्यात आली नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे या क्षेत्रात पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची असुन असे झाल्यास या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांचे मोठे नुकसान होवू शकते असे कदीर खान यांनी म्हटले आहे.दरम्यान नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारावर शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याने यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी निशीकांत गवई यांनी तात्काळ स्वच्छता विभागा करून सदरील नाला सफाई करण्यात यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कदीर खान यांनी म्हटले आहे.