यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जुलै २५ मंगळवार
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता यांची यावलहुन बदली झाली असून तालुक्यातील अजुन काहींच्या बदल्यांचे संकेत मिळाले आहे.दरम्यान यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेली ८ वर्षापासून शाखा अभियंता म्हणुन कार्यरत असलेले अजित निबांळकर यांची बारामती येथे बदली झाली आहे तर यावल येथेच तिन वर्ष सहाय्यक अभीयंता या पदावर कार्यरत असणारे केतन मोरे यांची बढतीवर अकोला येथे बदली झाली आहे.
दरम्यान विपुल चौधरी हे यावल सार्वजनिक बांधकाम विभागात रूजु झाले आहेत तर काही दिवसात अजुन काहींच्या बदल्या होणार असल्याचे वृत्त आहे.सदरहू यावल सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यरत दोघही अनुभवी सक्षम अधिकारी बदलुन गेल्याने या सर्व बाबींचा तालुक्यातील होवू घातलेल्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान काही वर्षापासुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी हे मुख्यालयात थांबत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या व विविध पदाधिकाऱ्यांच्या असुन बदलीच्या ठीकाणी व मुख्यालयात राहणारे अधिकाऱ्यांची नेमणुक यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागात झाल्यास सर्वसामान्य नागरीकांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून व्यक्त करण्यात येत आहे.