निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जनतेची झोकून देऊन कामे करा-आमदार किशोर पाटील यांनी भडगाव येथील निर्धार मेळाव्यात व्यक्त केले मत !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०१ जुलै २५ मंगळवार
मतदारांना गृहीत धरणारे राजकारणात कधीच यशस्वी होत नाही त्यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जनतेची झोकून देऊन कामे करा तरच जनता तुम्हांला निवडून देईल असे स्पष्ट मत आमदार किशोर पाटील यांनी भडगावात व्यक्त केले.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने काल दि.३० जून सोमवार रोजी आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.नुरानी हाॅल येथे आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील,शेतकरी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,तालुकाप्रमुख सुधाकर पाटील,समाधान पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी,नंदकिशोर पाटील,योगेश गंजे,माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले,गणेश परदेशी,सुनील देशमुख,शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील,युवासेनेचे जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील,कृउबाचे उपसभापती पी.ए.पाटील,शिंदिचे डाॅ.विलास पाटील,भाऊसाहेब भोसले,शेतकरी सेनेचे परशुराम माळी,विजय पाटील, जयंत पाटील,राजेंद्र परदेशी,अल्पसंख्यांक सेनेचे जि.अध्यक्ष इम्रान अली सैय्यद,युवासेनेचे योगेश सुर्यवंशी जगदीश पाटील,बापु पाटील आदि उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की,भडगाव तालुक्याने शिवसेनेला खुप काही दिले.प्रत्येक संस्थेत शिवसेनेला सत्ता दिली तर आगामी काळात होणार्या प्रत्येक संस्थेत शत प्रतिशत शिवसेनेचा झेंडा आपल्याला फडकायवाचा आहे त्यासाठी प्रत्येकाने आजपासून कामाला लागायचे आहे व त्यासाठीच निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शेवटी सत्तशिवाय शहाणपण नाही.जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील म्हणाले की,पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणूकीत आपल्याला प्रत्येक संस्थेवर भगवा फडकावयचा आहे व त्यादृष्टीनेच प्रत्येकाने कामाला लागायचे आहे.प्रत्येक गावात सभासद नोंदणी करून आपली ताकद दाखवायची आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,विकास पाटील गणेश परदेशी,डाॅ.विशाल पाटील यांचे भाषणे झाले.दरम्यान जुवार्डी,आडळसे येथील भाजपाच्या कार्यकर्त्याची सेनेत प्रवेश केला.प्रस्ताविक शहरप्रमुख अजय चौधरी,सुत्रसंचालन आबा महाजन तर आभार तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी मानले.
…तर शिवसेना अकेला चलो रे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणांत महायुतीतील घटक पक्षांनी जागा वाटपात त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जागा घेतल्यास निश्चित एकत्रितपणे निवडणुक लढू मात्र तसे न झाल्यास शिवसेनेची सर्व जागांवर एकट्याने लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.महायुतीबाबत प्रत्यक्षात निवडणुका लागतील तेव्हा होईल मात्र कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठीकाणी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले.दरम्यान सभासद नोंदणीवरन त्यांनी पदाधिकार्याचे कान उपटले तर कोणीही उमेदवारी गृहीत न धरता शंभर टक्के निवडुन येणाऱ्या उमेदवारास उमेदवारी मिळेल असे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.