महेश बोरसे,पोलिस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०२ जुलै २५ बुधवार
तालुक्यातील अनवर्दे येथे काल दि.१ जुलै मंगळवार रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गावात ठिकठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
दरम्यान काल दि.१ जुलै मंगळवार रोजी अनवर्दे ता चोपडा येथे एक जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने ‘झाडे लावा झाडे जगवा’ उपक्रम राबवित लोकनियुक्त सरपंच सचिन प्रल्हाद शिरसाट,ग्रामपंचायत सदस्य महेश ज्ञानेश्वर पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र संतोष शिरसाठ,पोलीस नायक चोपडा तालुका प्रतिनिधी महेश रामराव बोरसे,अंगणवाडी मुख्य सेविका शुभांगी सुनील बोरसे व अंगणवाडी शिपाई वंदना विनोद पारे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.प्रसंगी संपूर्ण गावात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरपंच सचिन शिरसाट,ग्रा पं सदस्य महेश पवार,माजी सदस्य रवींद्र शिरसाट,पत्रकार महेश बोरसे,अंगणवाडी सेविका शुभांगी बोरसे,वंदना पारे,ग्रामपंचायत शिपाई सुधाकर गोकुळ शिरसाट,ग्रामस्थ अरबाज खाटीक कांतीलाल बोरसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.