यावल महाविद्यालय कॉलेज कमेटी चेअरमनपदी प्रा.मुकेश येवले यांची नियुक्ती !! सेवानिवृत्ती कार्यक्रमातच नियुक्तीचे पत्र !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ जुलै २५ बुधवार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या मा.कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने दि.१ जुलै २०२५ पासुन संस्था संचलीत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल तालुका यावल जि जळगाव या महाविद्यालय कॉलेज कमेटीच्या चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली असे पत्र जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांनी दिले आहे.प्रा मुकेश पोपटराव येवले हे त्याच कला वाणिज व विज्ञान महाविद्यालय यावल येथील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रदीर्घ ३२ वर्ष सेवा देत असतांना दि.३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असतांनाच त्यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात सदरील नियुक्तपत्र देण्यात आले आहे हे विशेष !.
दरम्यान जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे व्हा चेअरमन विरेंद्र भोईटे व महाविद्यालयाचे माजी चेअरमन तथा माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,संख्येचे अध्यक्ष गोकुळ पाटील,जेष्ठ संचालक जयवंतराव येवले,संचालक परमानंद साठे,तज्ञ संचालक महेंद भोईटे,उमाकांत पाटील,सुनिल भोईटे यांच्या वतीने प्रा.मुकेश येवले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.सदर कार्यक्रमास माजी आ रमेश चौधरी,प्रभाकर सोनवणे,भगतसिंग पाटील,डॉ कुंदन फेगडे,प्राचार्य डॉ संध्या सोनवणे,नुतन मराठा महाविद्यालय जळगाव प्राचार्य डॉ एल पी देशमुख,वरणगाव येथील प्राचार्य विजय पवार,डी पी साळुंके,अनिल साठे,ग स सोसायटी संचालक राम पवार,मंगेश भोईटे,माजी प्राचार्य एफ एन महाजन,फैजपुरचे मा प्राचार्य डॉ जी पी पाटील,कॉग्रेस तालुका अध्यक्ष शेखर पाटील,माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे,माजी नगराध्यक्ष पिंटू राणे,माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते,माजी उप प्राचार्य सुरेश कदम,प्रा डॉ एम डी खैरणार,उप प्राचार्य प्रा.अशोक काटकर,उप प्राचार्य प्रा.अर्जून पाटील,विजय पाटील,मुख्यध्यापक एम के पाटील,मा मुख्याध्यापक प्रा किरण दुसाने,प्रा.बिरपणकर,इंदीरा गांधी उर्दु शाळेचे मुख्याध्यापक अय्युब खान,डॉ हेमंत येवले,अमोल दुसाने,अनिल कदम,प्रा.अजय भोईटे,अनिल इंगळे,प्रमोद काळे,प्रा संजय पाटील,वसंत पाटील,नितिन देशपांडे,सुभाष महाजन,शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील,नारायण चौधरी,उमेश फेगडे,देविदास पाटील,उजैनसिंह राजपूत,पी एस सोनवणे,वसंत पाटील,फैजपूर येथील पप्पू चौधरी,शेख शाकीर,दीपकआण्णा पाटील,यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी,करीम मण्यार,गणेश महाजन,अस्लम खान,दिलीप वाणी,हाजी गुलाम रसूल,हाजी अकबर खाटीक,हाजी याकुब शेठ,आर डी पाटील,बाळू फेगडे,नितीन पाटील,ललित पाटील,विवेक सोनार,योगेश लावणे,मिलिंद बोरघडे,बापू जासूद, अमित भंडारी,निलेश बेलदार,दीपक जोशी,आशिष पाटील,महर्षी व्यास संस्थानचे विश्वस्त अशोक जंगले,अशोक महाजन,शशी देशमुख,प्रमोद गडे,बापू पाटील,डॉ निलेश गडे,डॉ रमेश पाचपोळे,डॉ धीरज पाटील,डॉ उल्हास कुरकुरे,ॲड सुरडकर,ॲड निवृत्ती पाटील,ॲड अजय कुलकर्णी,ॲड रियाज पटेल,नानाजी पाटील,सहदेव पाटील,सुधाकर झोपे,रमेश देशमुख,पिंटू देशमुख व जळगाव महाविद्यालय,वरणगाव महाविद्यालय व यावल महाविद्यालय येथील प्राध्यापक व कर्मचारी व यावल तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शैक्षणिक संस्था संचालक व सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदरहू प्रा मुकेश येवले यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.