यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ जुलै २५ गुरुवार
येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ शांतता समिती सदस्य विजय त्र्यंबक सराफ यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला केलेल्या उल्लेखनिय सहकार्याबद्दल सन्मानपत्र देवुन नुकतेच गौरविण्यात आले.
जळगाव येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात नुकतेच पार पडलेल्या कार्यक्रमात यावल येथील जेष्ठ शांतता समिती सदस्य यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध ठीकाणाहुन आलेल्या जवळपास ३५ शांतता समितीच्या सदस्यांचे आपआपल्या गावात शहरात बंधुभाव राखुन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला केलेल्या उत्कृष्ठ कार्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी व अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.विजय सराफ यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व सहकारी शांतता समिती सदस्य व विविध स्तरावर स्वागत करण्यात आले.