यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जुलै २५ रविवार
येथील व्यास मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त काल दि.५ जुलै शनिवार रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यात इयत्ता ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी,जनाबाई,मुक्ताबाई,मीराबाई,ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान इत्यादी वेशभूषा साकारल्या.
यानंतर शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन व दिपाली धांडे यांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.दिंडी शाळेच्या परिसरातून गावातील प्रमुख मार्गाने विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली.या दिंडीत विद्याथ्यांनी लिझीम,टाळ,फुगडी व पाऊली खेळून गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.तसेच या दिंडीच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा,स्वच्छ परिसर सुंदर परिसर,बेटी बचाव बेटी पढाओ’ असे संदेश देवून जनजागृती करण्यात आली.विठ्ठल नाम घोषात विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.