यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जुलै २५ रविवार
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठोबा रायाच्या दर्शनासाठी भावीक मोठ्या संख्येने येत असून वारकरी संप्रदायाच्या दिंडींचे आगमन पंढरपूर येथे होण्यास सुरुवात झालेली आहे.यातच दि.२५ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर गोपाळपूर येथील श्री संत तुकाराम महाराज मठ येथे मुंबई येथील वारकरी मंडळींच्या दिंडीचे आगमन झाले.३०० वारकरी भावीक असलेल्या या दिंडीचे स्वागत मठाचे अध्यक्ष व किनगाव येथील इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व शैलजा विजयकुमार पाटील यांनी केले व मुंबई येथून आलेल्या समस्त वारकऱ्यांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
दरम्यान सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व त्यांचे बंधू तसेच डांग सौंदाणे महाविद्यालय नाशिकचे प्राचार्य डॉ.मुरलीधर हिरे यांनीही पायी दिंडीतून येत संत तुकाराम महाराज मठात निवास करत भोजन घेतले.तसेच धरणगाव येथील ह.भ.प.भगवान बाबा महाराज यांच्या दिंडीसह आडगाव ता.एरंडोल येथील ह.भ.प.भानुदास महाराज यांची दिंडी व खेडी भोकरी येथील ह.भ.प.बाळू महाराज यांची दिंडी अशा तीन वारकरी दिंड्यांसह एकुण २००० भावीकांची भोजन व निवासाची व्यवस्था श्री संत तुकाराम महाराज मठावर करण्यात आली.यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच माजी सरपंच,सदस्य,कर्मचारी आरोग्य सेवक व पोलीस पाटील उपस्थीत होते.या मठावर जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष व गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सुरेखा अशोक पाटील हे दांपत्य भाविकांची निस्वार्थी सेवा करीत आहेत.विजयकुमार देवचंद पाटील यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत वारकरी संप्रदायातील भाविकांच्या सेवेचा जो वाटा उचलला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक करत आभार मानले.