Just another WordPress site

यावल जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रूग्णवाहीकेला जाण्याची परवानगी मिळावी : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितिन सोनार यांची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ जुलै २५ रविवार

यावलहून जळगाव शहराला अवघ्या अर्धा तासाच्या अंतरात जोडणाऱ्या यावल शेळगाव मार्ग जळगाव या रस्त्यावर असलेल्या शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी घेवुन जाणाऱ्या रूग्णवाहीकेला जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंतीपुर्वक मागणी आपण पाटबांधारे विभागाकडे करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या रावेर लोकसभा विभागाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे.

यावल तालुक्यात अनेक वेळा अपघात होणे किंवा ईतर कोणत्याही कारणाने गंभीर झालेल्या रुग्णास यावल भुसावळ मार्ग जळगाव असे सुमारे जवळपास ५० किलोमिटरच्या अंतराने रूग्णवाहीकेतुन घेऊन जावे लागते.परिणाम अनेक रूग्णांचा मृत्यु हा उपचारासाठी विलंब होत असल्याने होत असतो त्यामुळे तापी पाटबांधारे विभागाने सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातुन अनेक रूग्णांचे जिव वाचतिल या दृष्टीकोणातुन यावल ते शेळगाव मार्ग जळगाव या अवघ्या २६ किलोमिटर लांब व ३० मिनिटाच्या प्रवास अंतराने जळगाव शहराला जोडणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शेळगाव बॅरेजच्या पुलावरून सद्या पाऊसाळा सुरू असल्याने व नागरीकांसाठीच्या पुलाचे काम हे सद्या सुरू असल्याने यावलहून रूग्णाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जाणाऱ्या रुग्णवाहीकेला पुलावरून जाण्याची परवानगी द्यावी तसे झाल्यास अनेक रूग्णांचे जिव वाचविण्यात मदत होईल असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांची मागणी असुन आपण या संदर्भात पाटबांधारे विभागाचे वरिष्ठांना पत्र देवुन विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.