यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जुलै २५ रविवार
येथील बँक ऑफ बडोदा शाखेतर्फे काल दि.५ जुलै शनिवार रोजी तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेअंतर्गत प्रत्येक गावात बँकेची ओळख अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.५ जुलै शनिवार रोजी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.तदनंतर उपस्थित प्रमुख पाहुणे सरपंच नवाज तडवी,राहुल गीते कृषी विभाग विभागीय अधिकारी बँक ऑफ बडोदा जळगाव,ऋषिकेश लाड व्यावसायिक कर्ज विभाग विभागीय अधिकारी बँक ऑफ बडोदा जळगाव,राहुल शेगोकार बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यावल,ललित चोपडे,विकास सोसायटी चेअरमन चंद्रकांत भिरूड,विशाल इंगळे कृषी विभाग अधिकारी बँक ऑफ बडोदा यावल,सामाजिक कार्यकर्ते राहुल आढाळे यांचा गुलाब गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नवाज तडवी हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामपंचायत व विकास सोसायटी सदस्य कल्पना राणे केले तर आभार विकास सोसायटी चेअरमन चंद्रकांत भिरूड यांनी मानले.
प्रसंगी राहुल शेगोकार बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यावल यांनी बँकेची ओळख,बँकेत खाते कसे उघडायचे,बँकेत खाते उघडण्याचे फायदे तसेच ‘गाव तिथे कार्यक्रम’ उपक्रमाबाबत माहिती दिली.तर राहुल गीते कृषी विभाग विभागीय अधिकारी बँक ऑफ बडोदा जळगाव यांनी मार्गदर्शन करतांना व्यावसायिक कर्ज,शेतीविषयक कर्ज,महिलांसाठी विविध व्यावसायिक कर्ज,महिला गटांना दिल्या जाणाऱ्या कर्ज योजना,शेतकरी पीक कर्ज,विविध शासकीय कर्ज योजना व त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा तसेच शासकीय अनुदानित योजना कोणत्या आहेत याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.प्रसंगी राहुल गीते कृषी विभाग विभागीय अधिकारी बँक ऑफ बडोदा जळगाव,ऋषिकेश लाड व्यावसायिक कर्ज विभाग विभागीय अधिकारी बँक ऑफ बडोदा जळगाव,राहुल शेगोकार बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यावल यांच्या वतीने उपस्थित गावकऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच प्रश्न जाणून घेण्यात आल्या व त्यांचे उचित मार्गदर्शन करून शंकांचे निरसन करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वितेकरिता विकास सोसायटी डोंगर कठोरा,बँक ऑफ बडोदा शाखा यावल व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अशोक तायडे यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.