Just another WordPress site

आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात !! पुलाचा कठडा तोडून प्रवासी खाजगी बस खाली कोसळली !! एक मृत तर २५-३० प्रवाशी जखमी झाल्याचा अंदाज !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

यावल-तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०६ जुलै २५ रविवार

तालुक्यातील आमोदा या गावाजवळ आज दि.६ जुलै रविवार रोजी सकाळी आमोदा-पिंपरुड रस्त्यावर एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.इंदोरहून जळगावकडे येणारी श्री गणेश लक्झरी खासगी प्रवासी बस क्रमांक एम पी ०९-९००९ ही पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून खाली कोसळली.या अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज असून २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान सदरील बस पुलावरून सुमारे १५ फूट खोल खाली उलटलेली असून अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे,पोलीस कर्मचारी तसेच फैजपूर युनिटचे होमगार्ड यांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून जखमींना तातडीने आपापल्या परीने मिळेल त्या वाहनाने व भुसावळ किंवा जवळच्या खाजगी रुग्णालयात किंवा जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या नदीमध्ये सुदैवाने पाणी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.सदरील अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा ब्रेक फेल होणे हे संभाव्य कारण मानले जात असून घटनास्थळी पोलीस, आपत्कालीन सेवा आणि क्रेनच्या सहाय्याने बस हटवण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे आमोदा परिसरात हा या दोन महिन्यातील २८ वा अपघात असून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.