यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जुलै २५ रविवार
येथील बाल संस्कार विद्या मंदिरात आज दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान विठ्ठल रुक्मिणी आणि आषाढी एकादशी या दिनाचे महत्व चिमुकल्यांना समजावे तसेच भक्ती भावाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा या उद्देशाने बाल संस्कार विद्या मंदिर व बालवाडीतील लहान मुलामुलींनी वेशभूषेसह कृतीयुक्त भजन गायन करून शाळेतील पटांगणावर भक्तिमय वातावरण निर्माण केले.प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित पालक,शिक्षक व विद्यार्थी भक्तीत तल्लीन झाले.सदर कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पूजा बालवडीच्या मुख्याध्यापिका शरयू कवडीवाले यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली च्या गजरात दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.तसेच विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची आरती करून सर्व विद्यार्थी व पालकांनी दर्शन घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला.सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.