यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर !! अनेक ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल झाल्याने हिरमोड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जुलै २५ बुधवार
सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ८ जुलै रोजी येथील तहसील कार्यालयाचे सभागृहात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या नियंत्रणात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे अध्यतेखाली सकाळी ११ वाजेला सोडत काढण्यात आली आहे.तर महिला आरक्षण प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजेला महंमद अली अंसार खाटीक वय १० वर्षे या बालकाचे हातून चिठ्ठीव्दारे सोडत काढण्यात आली आहे.आरक्षण सोडत कार्यक्रमास तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सरपंच,ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.सोडत प्रक्रियेत गाव निहाल व प्रवर्गनिहाय निघालेले आरक्षण पुढीलप्रमाणे असून कंसातील त्या प्रवर्गातील आहे.
अनुसूचित जाती आरक्षण
१) वनोली (महीला),दुसखेडा (महीला),न्हावी प्र.यावल (महीला),अंजाळे (महीला),निमगाव,किनगाव बुद्रुक,मोहराळे,डांभुर्णी
अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण
बोराळे,वड्री खुर्द,कोरपावली (महीला),म्हैसवाडी (महीला),कासवे (महीला),शिरसाड (महीला),मनवेल (महीला),कोसगाव,सांगवी खुर्द,पिळोदे खुर्द,मारुळ (महीला),बामनोद (महीला),पाडळसे, साकळी,विरोदे (महीला),हंबर्डी,बोरावल खुर्द (महीला),पिळोदे बुद्रुक,चिखली बुद्रुक (महीला),चितोडे (महीला),राजोरे
नागरीकाचा मागास प्रवर्ग (नामाप्र)
भालशिव,दहिगाव (महीला),हिंगोणे,आमोदे,भालोद (महीला),चुंचाळे (महीला),गिरडगाव (महीला),नायगाव,पिंप्री (महीला),सातोद,उंटावद (महीला),वढोदे प्र .सावदा (महीला),कासारखेडा, किनगाव खुर्द,कोळवद (महीला),महेलखेडी (महीला),विरावली
सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण
अट्रावल (महीला),डोंगर कठोरा (महीला),सांगवी बुद्रुक (महीला),चिखली खुर्द,चिंचोली, शिरागड,बोरखेडा बुद्रुक,डोणगाव (महीला),नावरे (महीला),सावखेडेसिम,थोरगव्हाण,न्हावी प्र.अडावद (महीला),वढोदे प्र.यावल (महीला),बोरावल बुद्रुक (महीला),पिंपरूड,टाकरखेडे,आडगाव (महीला) असे आरक्षण काढण्यात आले.