महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१० जुलै २५ गुरुवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच सचिन शिरसाट,ग्रामसेवक पाडवी मॅडम व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक घराघरात जाऊन जीवन ड्रॉपचे नुकतेच वाटप करण्यात आले.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्यापासून कोणते आजार पसरू नये याची खबरदारी घेत अनवर्दे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात पाणी शुद्धीकरण करणाऱ्या जीवन ड्रॉपचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच सचिन प्रल्हाद शिरसाट,उपसरपंच महेश पवार,ग्रामसेवक पाडवी मॅडम,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र संतोष शिरसाट,पोलीस पाटील मिलिंद आयरे, माजी ग्रामपंचायत सदस्य व पोलीस नायक चोपडा तालुका प्रतिनिधी महेश रामराव बोरसे,अंगणवाडी सेविका व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.