दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख
“निवडणूक आली की,देशमुख विरुद्ध पाटील असा सामना रंगवला जातो व त्यावेळी जातीचे विष पेरले जाते.मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल, आज आहे आणि उद्याही असेल तुमची दहशत नदीच्या काठापर्यंतच आहे त्यामुळे आमच्या नादाला लागायचे नाही.शिवाजी संस्थेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक धक्काबुक्की केली पण याद राखा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही.त्याचबरोबर जुना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही,’असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला आहे.वरूड येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आज झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व्यासपीठावर होते.त्यावेळी जनतेला संबोधित करताना देवेंद्र भुयार यांनी हे वक्तव्य केले आहे.भुयार म्हणाले की, पैशांचा आपला विषय नाही बरेच लोक म्हणत होते की मागच्यावेळी फुकट निवडणूक जिंकली आता पुढच्या वेळी काय?समोरची निवडणूक कठीण आहे पण मी त्यांना सरळ सांगतो की ज्या दिवशी निवडणुकीत चिकन,मटण आणि पैसे वाटायचे काम येईल त्या दिवशी राजकारणाचा धंदा सोडून शेती करेन.
यातून मला बदनाम करण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातोय असेही भुयार म्हणाले,त्याचबरोबर मी शेती करायला सक्षम आहे माझे हात काही बांधले नाहीत.चुकीच्या पद्धतीने राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही.भुयार पैसे घेतो का?भुयारचे काही वेगळे धंदे आहेत का?याचा शोध घेतला जातो पण मी सांगतो मला काही लोक जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.