यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २५ गुरुवार
यावल तसेच परिसरातील खेडेगावांमधील बाजारात कार्टूले हि रानभाजी यंदा लवकरच दाखल झाली असून नागरीकांचा या आरोग्यासाठी पोषक असे शक्तीशाली गुणधर्म असलेले कार्टूले खरेदीला खवय्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान नैसर्गिकरित्या वेलावर वाढणारी आरोग्यदाई भाजी म्हणुन प्रसिद्ध असलेले कार्टूले यंदा लवकरच विक्रीस आले खरे परंतु बाजार फारच कमी प्रमाणात आल्याने विक्री करणारे भाव खाऊन विक्री केली जात आहे.कार्टूले ही एक रानभाजी असुन ज्याला काटेरी,कटेले किंवा कंटोला देखील म्हणतात.या आरोग्यदायी भाजीला कंदमुळे असतात आणी ती एका वेलावर वाढणारी भाजी आहे. कार्टूल्यात विटामिन्स,मिनरल्स आणी फारबर भरपुर प्रमाणात असतात.कार्टूले हे शक्तीशाली औषद्यी गुण असलेली रानभाजी असुन आरोग्य तज्ञांच्या माहितीनुसार कार्टूले खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व शरीराचे पोषण होते.यामुळेच कार्टूले या रानभाजीची यंदा बाजारात आवक कमी असल्याने सद्या महाग विकले जात असुनही खवयांकडून विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.