यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१७ जुलै २५ गुरुवार
तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये एक वर्ग एक वृक्ष हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत एक वर्ग एक झाड हे ध्येय लक्षात ठेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाचे एक झाड लावून त्याचे औक्षण केले व त्या झाडाला टिकवण्याची प्रतिज्ञाही घेतली.
दरम्यान सदरील शाळेत इ.१ ली ते इ.१० वी पर्यंतचे जवळपास १७ वर्ग असून सदर विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाचे १ झाड वेगवेगळ्या ठिकाणी लावली.यात वड,पिंपळ,निंब,आंबा,अशोक वृक्ष,सिसम व चिंच अशी वेगवेगळी झाडे विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने व आनंदाने ती झाडे लावली आणि आम्ही आमच्या सारखीच या झाडांची काळजी घेऊ असे आश्वासन ही विद्यार्थ्यांनी दिले.या उपक्रमात शाळेचे संस्थापक चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनीष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव इ.सह सर्व शिक्षक आपापल्या वर्गा समवेत या उपक्रमात सहभागी झाले होते.