आदिवासी प्रकल्प विभागा अंतर्गत जिल्ह्यातील आश्रम शाळांमध्ये मानसिक आरोग्य तपासणीबाबत प्रशिक्षण शिबीर !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २५ सोमवार
यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या दहिवद येथील शासकीय माध्यमीक आश्रम शाळेत एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प विभाग आणि नॅशनल ईन्सटूयुट ऑफ मेन्टल अॅण्ड न्युरोसायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य तपासणीबाबत प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
यावल एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.सदर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जि आर एम लवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी जी जी संदीप पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित जळगाव जिल्ह्यातील शासकीय अनुदानीत आदिवासी आश्रम शाळांमध्ये शाळेचे अधिक्षक व अधिक्षक यांचे दोन दोन दिवसाचे मानसिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.दरम्यान आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या मानसिक समस्या सोडवुन विद्यार्थ्यांचे होणाऱ्या आत्महत्या रोखण्याविषयी या मानसिक आरोग्य तपासणी शिबीरास १०४ प्रशिणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.सदरच्या प्रशिक्षण शिबीरात प्रशिक्षक म्हणुन प्रकल्पाचे मास्टर ट्रेनर गणेश तांदळे व जिम पल्लवी सोनोने,जिम प्रियंका राठोड यांनी विद्यार्थ्यांना म्हत्वाचे मार्गदर्शन केले.