शिवसेना अंगार आहे व अंगाऱ्याशी खेळण्याचा प्रयत्न केल्यास राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय शिवाय राहणार नाही.
शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा भाजपाला अप्रत्यक्ष इशारा
मुंबई-पोलिसनायक (वृत्तसंस्था) :-शिवसेना अंगारा आहे ,शिवसेना ज्वलंत निखारा आहे व या निखाऱ्यांशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर खेळ खेळणाऱ्या राजकारण्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही.असा प्रेमाचा सल्ला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपाला अप्रत्यक्ष दिला आहे.तर गेली ३० वर्षांपासून शिवसेनेने एकाच पक्षावर मोठ्या दिलदारपणाने विश्वास ठेवला परंतु त्या मित्रपक्षांने केसाने गळा कापून विश्वासघात केला आहे असे म्हणत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.त्यांनी संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीनिमित्त प्रतिक्रिया देतांना आपले विचार मांडले आहे.
उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करून अतिशय योग्य पाऊल उचलले आहे.हि सुरुवात असून अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे कारण शेवटी शिवसेना टिकावी हि शिवसैनिकांसोबतच अखिल भारतीयांची इच्छा आहे.उद्धवजी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत केलेली युती हि विचारपूर्वक व योग्य आहे परिणामी मी या युतीचे स्वागत करीत आहे असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्याचा मान हा शिवसेनेचा असला तरी तो मेळावा देशाची शान आहे त्यामुळे या मेळाव्यास कोणी विरोध करणार नाही परंतु कोणी विरोध केलाच तर मात्र शिवसेना अंगारा आहे ,शिवसेना ज्वलंत निखारा आहे व या निखाऱ्यांशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर खेळ खेळणाऱ्या राजकारण्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही.असा प्रेमाचा सल्ला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपाला अप्रत्यक्ष दिला आहे.