यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २५ सोमवार
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर,तहसीलदार यावल,गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल व मुख्याधिकारी नगरपरिषद यावल व फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “न्याय आपल्या दारी,समाधान आपल्या हाती ” या संकल्पनेतून तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ग्रामपंचायत मंगल कार्यालय येथे उद्या दि.२२ जुलै २५ मंगळवार रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावेर यावल विधानसभा आमदार अमोल जावळे,उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्यासह महसूल,पंचायत समिती व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
या शिबिरात महसूल विभाग,पुरवठा विभाग,कृषी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना थेट गावातच राबवल्या जाणार असून या शिबिरात कुटुंब अर्थसहाय्य योजना,उत्पन्नाचा दाखला,शाळेसाठी दाखला,जात दाखला,राशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे,PM किसान योजनेसाठी लँड सीडिंग व ई-केवायसी,दुष्काळी अनुदानासाठी ई-केवायसी नोंदणी,कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया अशा विविध योजनांचा लाभ याठिकाणी मिळणार आहे.तरी गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिक,महिला भगिनी व शेतकरी बांधव,युवक आणि युवती यांनी या शिबिरात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल,पंचायत समिती,कृषी विभाग तसेच विविध विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.