भाजप-मनसेचे नाते लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखे !
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांची टीका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे.त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजप आणि मनसे वर निशाणा साधला आहे.भाजप-मनसेचे नाते लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारख आहे टीका त्यांनी केली आहे.सूरज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे की,भाजप व मनसे यांचे नाते लग्नाच्या आधी लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखे झालेले आहे.दोघांचीही पार्टनर बदलायची सवय व पूर्वानुभव बघता हे नाते मुंबई महानगर पालिका निवडणुकी पर्यंत टिकेल का?अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान राज्यातील महाविकास सरकार कोसळायच्या आधी पासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक वाढली आहे.राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करताच भाजपने त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते.त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असले तरी उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेची भूमिका गेमचेंजर ठरू शकते.