यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ जुलै २५ मंगळवार
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे,ढोर,महादेव,मल्हार कोळी समाज बांधवांची येणाऱ्या दि.९ ऑगस्ट २५ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक आदिवासी दिन असल्याने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन दि.२३ जुलै २५ रोजी बुधवारी सकाळी ११ वाजता यावल तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सभागृहात जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे वढोदेकर यांच्या अध्यक्षस्थानी आयोजीत करण्यात आली आहे.
तरी जळगाव जिल्हाभरातील सर्व आदिवासी कोळी समाज्याच्या संघटनांचे पदाधिकारी,वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व सर्व सरपंच,उपसरपंच,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,जेष्ठ मार्गदर्शक,महिला भगिनी व तरूण बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी कोळी समाज क्रांतिदिन समितीतर्फे समाजाचे तालुक्यातील सर्व सरपंच सर्व संघटनांतर्फे करण्यात आले आहे.