जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २५ बुधवार
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.२२ जुलै मंगळवार रोजी अटल भाजपा कार्यालय भडगाव येथे अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काल २२ जुलै २५ मंगळवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अटल भाजपा कार्यालय नवकार प्लाझा पंचायत समिती भडगाव व अमोलभाऊ शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी बोलतांना अमोल शिंदे यांनी सांगितले की,पक्षाच्या आदेशानुसार आज हे शिबिर राबविण्यात आले असून कार्यकर्ते युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच भविष्यातही अशाच पद्धतीने व यापेक्षा मोठे रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर व विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील,प्रास्ताविक किरण शिंपी,विशाल चौधरी तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.
यावेळी माजी विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे,माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,माजी जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील,ज्येष्ठ पदाधिकारी दगडू महाजन कोळगाव,दिलीप सहस्रबुद्धे,नीलेश मालपुरे,विनोद नेरकर,देविदास पाटिल,माजी नगरसेवक सचिन चोरडिया,माजी शहराध्यक्ष शैलेश पाटील,नरेंद्र पाटील,मुन्ना परदेशी,एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे,यश चोपडा,माजी नगरसेवक संजय सोनवणे,किरण मोरे,डॉ प्रतापराव पाटिल,डॉ अमृत पाटील, प्रवीण पाटील पेठ,दत्तु सुर्यवंशी शिंदी,सुनील पाटिल लोण,दिगंबर पाटिल गूढे,भाईदास पाटिल वडजी,राजेंद्र शिंपी,कैलास पाटिल,केमिस्ट असो.अध्यक्ष सुरेश भंडारी,तांदूळवाडी सरपंच नकुल पाटील,वाल्मीक पाटील,विश्वनाथ भोई,कजगाव माजी सरपंच मनोज धडीवाल,प्रदिप पाटील वडजी,विजय गायकवाड,योगेश बोरसे गिरड,रविंद्र वाडेकर,मंगेश पाटिल निंभोरा,राहूल देशमुख,कुणाल पाटील,निखिल कासार,योगेश शेलार,बापूराव शार्दुल,बन्सीलाल परदेशी,अमोल महाजन,अरुण पाटील,किरण शिंपी,विशाल चौधरी,ललित धनगर,सचिन पवार,शुभम सुराणा,विकास महाजन,भूषण पाटिल पिचर्डे,रेड प्लस जळगावचे डॉ दीपक पाटील,टेक्निशियन सत्यम राठोड,उमेश पाटिल,पूजा मॅडम,भाजपचे अमोल महाजन,मनोहर गिरनार पिंपरखेड,अरूण पाटील अंजनवीहरे,भडगाव, कनाशी,कोटली,शिंदी,पीचर्डे,अंजन्विहरे,गिरड,पळासखेड,महिंदळे आदी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.