Just another WordPress site

सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ जुलै २५ बुधवार

तालुक्यातील सांगवी बु येथे काल दि २२ जुलै मंगळवार रोजी दुपारी १ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय मोहनमाला नाझीरकर तहसीलदार यावल उपस्थित होत्या त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी भरत वारे व इतर विभाग प्रमुख यांनी देखील उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांना अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहता आले नाही.तरी देखील त्यांचे प्रतिनिधी म्हणून परिसरातील प्रगतिशील शेतकरी लोकहितेशी नारायण चौधरी,किरण महाजन अट्रावलकर,भुषण नेहते भालोद,भरत पाटील उपसरपंच हिंगोणा,अतुल फिरके उपसरपंच सांगवी बु,योगेश भंगाळे सांगवी बु,सागर कोळी यावल,डिगंबर खडसे डोंगर कठोरा इ. मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पाटील ग्राम महसूल अधिकारी डोंगर कठोरा यांनी केले तर आभार प्रदर्शन हे हेमा सांगोळे ग्राम महसूल अधिकारी अट्रावल यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु गोरटे ग्राम महसूल अधिकारी सांगवी बु व सागर तायडे महसूल सेवक सांगवी बु यांनी परिश्रम घेतले तसेच मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी अमुल्य सहकार्य केले.तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महसूल विभागातील जटील बाबी देखील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना साध्या सोप्या भाषेत लक्षात आणुन अंत्योदय हेच ध्येय आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.तर लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून समस्या संकलन -कार्यवाही -समाधान या कार्यप्रणालीचा अवलंब करून शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवायची आहे हे देखील तहसीलदार यावल यांनी अधोरेखित केले.प्रसंगी डोंगरकठोरा येथील लच्छमन बारेला या दिव्यांग लाभार्थी यांना तातडीने लाभ देवुन मंचावरून खाली येत मंजुरी आदेश दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.