यावल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने “सजग युवती सक्षम युवती” कार्यक्रम संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जुलै २५ शनिवार
चूल आणि मूलच्या पलिकडे जाऊन मुलींनी संस्कारांची जपवणूक करून स्वतःच्या पायावर स्वतः सक्षमपणे उभे राहणे आज काळाची गरज आहे असे आवाहन माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज येथे केले ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आयोजित ‘जनविश्वास सप्ताह’ निमित्त “सजग युवती सक्षम युवती” कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष रितेश पाटील,तालुका उपाध्यक्ष राजेश करांडे,महिला शहराध्यक्ष योगिता घोडके,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,कामराज घारु,जुगल पाटील,आकाश चोपडे,पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे,हर्षल पाटील (जळगाव) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.हा कार्यक्रम साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रांगणात पार पडला.प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.माजी मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की,छ्त्रपती शिवाजी महाराज कसे वाढले हे कळण्यासाठी माँ जिजाऊ माहित असली पाहीजे,महात्मा ज्योतीबा फुले,सवित्रीबाई फुले यांनी त्याकाळी महिलांना शिक्षणासाठी काय प्रयत्न केले हे कळण्यासाठी त्यांचे चरित्र वाचणे गरजेचे आहे.आपल्या जिवनात आपल्यालाच मेहनत घ्यावी लागणार आहे व त्यामुळे राष्ट्राचे हात मजबूत होणार आहेत.यावेळी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सोशल मिडिया हाताळतांना युवती व महिलांनी काय काळजी घ्यावी ? या विषयी महत्वाच्या टिप्स दिल्या.त्यानंतर जळगाव येथील व्याख्याते हर्षल पाटील यांनी आजच्या युगाची तुच जिजाऊ,तुच सावित्री उद्योगिनी या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.यावेळी हर्षल पाटील यांनी मुलींनी स्वसंरक्षण स्वतः करणे आवश्यक आहे व त्यासाठी त्यांनी खंबीर व वेळप्रसंगी कठोर होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेस रावेर लोकसभा विभागाच्या वतीने सजग युवती सक्षम युवती व एक झाड माझ्या दादांचं…! या उपक्रमांतर्गत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहा विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
माझ्या माहेराच्या तालुक्यात तुम्हाला जावेच लागेल असा माजी मंत्र्यांना त्यांच्या धर्मपत्नीकडून आदरयुक्त दम…..तर मायेचा हात देऊन नक्की ये म्हणून बहिणीची भावाला विनंती !! ……….
सदरहू आजच्या कार्यक्रमाची पत्रिका मी घरी माझ्या धर्मपत्नीला दाखविली असता तिने माझ्या माहेराच्या तालुक्यात तुम्हाला जावेच लागेल असा आदरयुक्त दम दिला.मी हा विषय माझी बहिण याच यावल तालुक्यात दिली असून तिला या कार्यक्रमासाठी येत असल्याचे सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला तिने मला मायेचा हात देऊन नक्की ये म्हणून विनंती केली असा प्रसंग माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगताच उपस्थितांत हशा पिकला….. !!