यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२६ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे आज दि.२६ जुलै शनिवार रोजी ‘ग्रीन डे ‘ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यात इ.१ ली ते इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमात विद्यार्थी,विद्यार्थिनींसह शिक्षकांनी देखील हिरवे कपडे परिधान केले होते.ज्याप्रमाणे निसर्ग हिरवा शालू परिधान करतो त्याचप्रमाणे शालेय वातावरण हिरवेगार आणि प्रसन्न झाले होते.
दरम्यान विद्यार्थ्यांनी ‘ग्रीन डे ‘चे महत्व सांगत ‘ग्रीन डे’ विषयी प्रतिज्ञा घेतली व सर्वीकडे ग्रीन (हिरवड) कशा पद्धतीने राहील झाडे तसेच कोणीही झाडे तोडणार नाही किंवा जो कोणी झाडे तोडत असेल त्याला झाडांचे महत्त्व आम्ही पटवून देऊ अशी माहिती विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसमोर सांगितली.त्यानंतर पर्यावरणाशी पूरक असलेल्या गीतांवर इ.१ ली ते इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी वापरात असलेल्या फळभाज्या व पालेभाज्यांच्या वेशभूषेत त्यांचे महत्त्व,फायदे व त्यांचे गुणधर्म इ.विद्यार्थ्यांसमोर मांडले तर शाळेचा आवरणात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली त्यात वेगवेगळ्या घोषणा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे झाडे लावून ‘ग्रीन डे’ आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील, संचालिका सौ.पूनम मनिष पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व .१ली ते ई. ४थी चे शिक्षक वृंद उपस्थित होते.