आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल येथे राष्ट्रवादी शरद पवार कॉंग्रेसची बैठक संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जुलै २५ शनिवार
आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक विभागाचे पदाधिकारी यांचा संपर्क दौरा पार पडला.यानिमित्ताने काल दि.२५ रोजी शुक्रवार रोजी येथील फ्रुट सेल सोसायटी सभागृहात युवकचे नवनियुक्त जळगाव जिल्हा अध्यक्ष विश्वजित पाटील,प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद,महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभुमीवर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत संघटन वाढीसह विविध विषयांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
सदरील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,जेष्ठ पदाधिकारी विजय पाटील,प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील,जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांनी युवकांना संघटन वाढीसाठी मार्गदर्शन केले.यावेळी प्रदेश आदिवासी सेलचे एम बी तडवी,युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,नानाजी पाटील,ललित पाटील,किरण पाटील,किशोर माळी,प्रसन्न पाटील,अरुण लोखंडे,VJNT सेल तालुकाध्यक्ष रोहन राठोड,युवक उपाध्यक्ष पवन महाजन,ईश्वर पाटील, गणेश पवार,मुकेश दामोदर,प्रदिप पाटील,बापू जासूद,नरेंद्र पाटील,हाजी युसूफ शेठ,गिरीश पाटील,शेख सद्दाम,मोहसीन खान,शेख युसुफ,ललित पाटील,संतोष तायडे,शेख वजीर शेख सुपडू,जाहीद कुरेशी,आबीद कच्ची,सहदेव पाटील,डॅनिश पिंजारी,तुषार येवले,शरीफ तडवी,राहुल गजरे,मिलिंद सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.